संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 **********
+91 **********
ई-मेल :
gppimpalgaonbhatata@gmail.com
पत्ता
पिंपळगाव भटाटा, ता.इगतपुरी, जि.नाशिक 422209
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
खरोली ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पिंपळगाव भटाटा हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वाकीखापरी धरणाच्या कडेला वसलेले एक मध्यम आकाराचे गाव आहे.
2011 जनगणनेनुसार पिंपळगाव भटाटा गावाची लोकसंख्या ११४८ आहे ज्यामध्ये ५४३ पुरुष आणि ६०५ महिला आहेत.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 262 आहे.
- पिंपळगाव भटाटा मध्ये ६ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो. तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
पिंपळगाव भटाटा पुनर्वसन झाल्यावर गावासाठी पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी ४०००० क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली. संपूर्ण योजना पाईपलाईन देखभाल दुरुस्तीसह ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. परंतु सदर पाईप लाईनला गळती होऊन ती ग्रामपंचायत ने पंधरावित्त आराखडा मधून पाईप लाईन दुरुस्ती करण्यात आली. व गावांना वैयक्तिक नळ योजना या मधून देण्यात आली.व आज रोजी पाणीपुरवठा होत आहे.